Ghazal By Seyed Wasioddin Parwana| गजल सय्यद वसीयोद्दीन परवाना

 गजल

सय्यद वसीयोद्दीन परवाना, बीड

 

ओठांवरती हास्य फुलवुनि मला पाहिले तिने

कळले नाही मी फसवले कि मला फसवले तिने

 

सौंदर्य अन चातुर्याचा मेळ दुर्मिळ योग असे

चातुर्याने मजकडून सौंदर्य वदविले ते तिने

 

असीम प्रेम मनी अन् सक्तिने लादलेली बंधने

दोन्ही जपुनि युक्तीने स्वप्नात बोलावले तिने

 

प्रेम परंपरेत जोडया गाजल्या आजवर त्या किती

जगभरातील विक्रम जणुं मोडीत काढले तिने

 

प्रितीचा 'परवाना' भेटतां काळीज कित्येक करपले

धुमसत ठेवले मी अन् आग भडकवली तिने


सय्यद वसीयोद्दीन परवाना 

 



घर क्रं. १-१०-५१३ जमजम कॉलनी

बार्शी रोड बीड- ४३११२२ 

मोनं. ८८३०३३६४३५

Post a Comment

Previous Post Next Post

Ad 1

Ad 2