Ghazal By Seyed Wasioddin Parwana| गजल सय्यद वसीयोद्दीन परवाना

 गजल

सय्यद वसीयोद्दीन परवाना, बीड


छायाचित्र तुझे मज चोरून पाहणार नाही

राग आणुनि लटका मजवर रूसणार नाही

 

चाहुल न लागू देतां मागून येणें ते तुझे

हळूवार डोळे झाकून ओळख विचारणार नाही.

 

हळवे मन तुझे मज सदैव आनंदी ठेवणारे

निराश पाहुन मजसाठी आश्रू गाळणार नाही

 

स्वैर वातावरणी बट ती हवेत उडणारी

हसत मुखाने ऐटीत मागे सारणार नाही

 

विरहाच्या आगीत होरपळतांना "परवाना"

मिलनाच्या वर्षावाने आग विझवणार नाही.

 

सय्यद वसीयोद्दीन परवाना 

Ghazal Wasioddin Parwana


घर क्रं. १-१०-५१३ जमजम कॉलनी

बार्शी रोड बीड- ४३११२२ 

मोनं. ८८३०३३६४३५

Post a Comment

Previous Post Next Post

Ad 1

Ad 2